
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथील गणेश शिंदे यांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करत होते. त्यांचे या कार्याची दाखल घेऊन हे जे शासन अधिकृत मान्यता प्राप्त ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डद्वारे त्यांचे डायरेक्टर माननीय इंद्रजित मोरे यांनी गणेश शिंदे यांना सन्मान देऊन त्यांची नोंद करुण त्यांच्या अधिकृत प्रकाशीत करत असलेल्या राष्ट्रीय रेकॉर्ड प्राप्त बुक २०२५ मध्ये केली आहे.
यापूर्वी ही दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रेट विनर वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड द्वारे त्याचे डायरेक्टर माननीय श्री. इंद्रजित जी मोरे यांनी या आंतराष्ट्रीय रेकॉर्ड ने सन्मान त्यांची नोंद त्यांच्या अधिकृत प्रकाशित करत असलेल्या आंतराष्ट्रीय रेकॉर्ड प्राप्त बुक २०२२ मधे केली होती त्यांच्या सारख्या एक सामान्य सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला माननिय श्री. इंद्रजित जी मोरे यांनी वेळोवेळी प्रोत्साहित करून योग्यतो सन्मान दिल्याबद्दल असे त्यांनी मुलाखती दरम्यान सांगीतले व त्यांचे मनापासून आभार मानले.