
रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेश अध्यक्षा मेघाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोजगार व स्वयंरोजगार सेलची आढावा बैठक रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेश अध्यक्षा मेघाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालय घेण्यात आली.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पद नियुक्ती देण्यात आल्या तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व जिल्हा अध्यक्षांनी कार्यकारिणी करणे महिन्यातून एकदा आढावा बैठक मुंबई पक्ष कार्यालयात होईल त्यासाठी सर्वांची उपस्थितीत असणे तसेच आढावा सादर करणे, त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष यांनी ही दर 3 महिन्याला आढावा बैठक विभागात घ्यायची आहे तसेच रोजगार व स्वयंरोजगारच्या कामाचे स्वरुप कसे असावेत प्रत्येक गाव पातळीवर आपल्या पदाधिकारी यांनी काम कसे करावे, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन मार्ग काढायला हवा, जास्तीत जास्त महिला, महिला बचतगट, युवक यांना रोजगार व स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्यात याव्यात संदर्भातच्या मेघा पवार यांच्याकडून सूचना देण्यात आल्या.
या बैठकीसाठी प्रदेश सचिव भाग्यश्री माने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश मंगाणे, मराठवाडा अध्यक्ष सतिश साळुंखे जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते.