
तळेगाव : प्रतिनिधी
वडगाव शहरात वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. मावळ तालुका युवा अध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
वडगाव शहराचे उपाध्यक्ष पवन उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर शाखेच्या विविध पदावर कार्यकर्त्यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली. वडगाव शहर वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणी पुढील प्रमाणे -अध्यक्ष प्रमोद राजाराम खंडारे, उपाध्यक्ष संतोष सुखदेव सुळोकार, अमर दिलीप बाबर, महासचिव वृषभ बाळासाहेब निकाळजे, सचिव अमोल जयनंद खिलारे, सहसचिव कपिल साळवे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी मा.ता.अध्यक्ष नितीन ओव्हाळ, ता. युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, ता. महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, महासचिव हर्षदा गजरमल, युवा महासचिव अक्षय साळवे, ता. युवा उपाध्यक्ष नानासाहेब मोटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची ध्येय धोरणे व भूमिकेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ता. उपाध्यक्ष सुनील वाघमारे, तालुका महासचिव सुधीर ओव्हाळ, लहू लोखंडे, अंदर मावळ विभाग अध्यक्ष दिनेश गवई, सनी गव्हाळे, पवन मावळ कार्याध्यक्ष संदीप कदम, त.दा.शहर महासचिव प्रवीण शिंदे, सुमित साळवे, रणजीत कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा आघाडीचे मावळ तालुका प्रवक्ते जिजाभाऊ सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका युवा सचिव बब्रुवान कांबळे यांनी केले तर आभार वडगाव शहराचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष प्रमोद खंडारे यांनी मानले.
About The Author

