Spread the love

तळेगाव : प्रतिनिधी

लोणावळा येथे खोंडगेवाडी विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणावळा मनसे व छत्रपती शिवराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. ८ ) रोजी ‘एक पाऊल शिक्षणासाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.

मनसे लोणावळा शहर उपाध्यक्ष मधुर पाटणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, प्रवक्ते अमित भोसले, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश आप्पा गवळी, नरेश खांडगे, गुलाब मराठे, गिरीधर पाटणकर, लहू गायकवाड, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, भाजपा व्यापार संघटनेचे अध्यक्ष अभय पारेख, मनसेचे संदीप बोभाटे, विश्रांत साठे, कैवल्य जोशी, जुबेर मुल्ला, कल्पेश गुरव या मान्यवरांसह अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. एक पाऊल शिक्षणासाठी या उपक्रमाचे लोणावळा शहर व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *