
नवी दिल्ली : प्रतिनिधी
पंचवीस वर्षांपासून बाबा कांबळे यांनी रिक्षा-टॅक्सी चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते, धुणी-भांडे काम करणाऱ्या साफसफाई कामगार, कागद-पत्र वेचणाऱ्या अशा दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी अथक लढा दिला आहे. त्यांनी या समाजाच्या जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून दीर्घकाळ संघर्ष केला. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी पथारी हातगाडी पंचायत यांचे संस्थापक अध्यक्ष, गोरगरीब कष्टकऱ्यांचे खरे नेतृत्व, डॉ. बाबा कांबळे यांना नवी दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात यूएसए विद्यापीठाच्या वतीने पीएचडी डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. बाबा कांबळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि आंदोलनांमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांनी फेरीवाल्यांसाठी कायदा मंजूर केला. साफसफाई कामगार महिलांसाठी विशेष कायदा अस्तित्वात आला. बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी कायदा लागू झाला. रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले.
या सर्व कायद्यांमध्ये बाबा कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या दृढनिश्चयामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे कायदे प्रत्यक्षात येऊ शकले.
या सामाजिक कार्याच्या दखल घेत, यूएसए विद्यापीठाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना पीएचडी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा सन्मान आहे.
डॉ. बाबा कांबळे यांचे हे यश प्रत्येक कष्टकरी, वंचित आणि समाजातील दुर्लक्षित घटकांचा विजय आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला आणि समर्पणाला सलाम करत असल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी म्हट
ले आहे.
About The Author

