Spread the love

लोणावळा : प्रतिनिधी

लोणावळा शहरातील ऑटोमॅटिक एलटीडी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणारे कामगार दत्तात्रय कोळसकर (वय ३९, रा. क्रांतीनगर, लोणावळा) हे मागील सहा महिन्यांपासून कार्यरत होते. काम करत असताना अचानक चक्कर येऊन पडून डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मरण पावले.

कंपनी ही कामगार कायद्याच्या अंतर्गत सर्व बाजू पडताळून पाहून ह्या प्रकरणात कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हती . त्यांच्या नातेवाईकांचा मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांना तात्काळ फोन आला असता मनसेचे अध्यक्ष निखिल भोसले, अमित भोसले, दिनेश कालेकर,संदिप बोभाटे,अभिजित फासगे,मधुर पाटणकर आदी पदाधिकारी संजीवनी हॉस्पिटल मध्ये तात्काळ दाखल झाले असता कंपनी आणि पिडीत कुटुंबिय यांच्यामध्ये वाद चालू होता.

कंपनीला मनसेने मनसे स्टाईलने धारेवर धरले असता कंपनीने आपली भूमिका मवाळ करत भरपाई देण्याची तयारी दाखवली.आणि मयताच्या तिन्ही लहान मुलींसाठी प्रत्येकी एक लाख प्रमाणे तीन लाख देण्याचे कबूल केले. मनसेचे नेते नितीन सरदेसाई साहेब तसेच बाबू वागस्कर यांची सुद्धा सदर प्रकरणात मदत झाली.

या मदतीचा धनादेश मयताची पत्नी आणि मुली यांना कंपनीचे अधिकारी व मनसेचे रमेश म्हाळस्कर, दिनेश कालेकर,अमित भोसले, मधुर पाटणकर, अभिजित फासगे, विपुल माने, संदिप बोभाटे, विश्रांत साठे, सुनिल सोनवणे, सुभाष रेड्डी, श्रेयस कांबळे, कैवल्य जोशी आदी पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच मनसे लोणावळा शहर हे कोळसकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून पुढे ह्या कुटुंबीयांच्या सोबत राहील असा शब्द कुटुंबीयांना मनसेच्या वतीने देण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *