
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगावातील ऑर्डनन्स डेपोमधील जवान व कर्मचाऱ्यांनी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीकाठ परिसरात एक मेगा स्वच्छता मोहीम राबविली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक जबाबदारी या भावनेतून या उपक्रमात लष्करी कर्मचाऱ्यांच्या बरोबर माळवाडी, कोटेश्वर वाडी, शेलारवाडी येथील ग्रामस्थ व नगरपालिका कर्मचारी तसेच ४०० पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन जमीन पुनर्सचियित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता या थीम खाली एकत्रित येऊन हे कार्य केले.
या स्वच्छता मोहिमेत दोन जेसीबी व एक ट्रॅक्टर विना मोबदला या कार्यासाठी देण्यात आला होता. तसेच स्वयंसेवकांनी तयार केलेले पर्यावरणीय घोषवाक्य आणि भिंतीवर चित्रकला काढण्यात आली. स्वच्छ भारत अभियान आणि हवामान लवचिकतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टाचे नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी नागरी लष्करी सहकार्याचे हे एक उत्कृष्ट मॉडेल या कार्यक्रमाने दाखविले आहे. ही स्वच्छता मोहीम ऑर्डनन्स डेपो तळेगावचे कमांडंट कर्नल शशांक सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होती. नदीचे पर्यावरणीय संतुलन पुनर्सचयित करणे. सार्वजनिक स्वच्छता वाढविणे. आणि स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता निर्माण करणे हे या स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट होते.
यावेळी बोलताना कर्नल शशांक सिंग म्हणाले की ही केवळ स्वच्छता मोहीम नाही तर ही एक जबाबदारी आणि शाश्वतेचा संदेश आहे. या यशा मागील खरी ताकद सैन्या आणि एकत्रित नागरिक यांच्यातील समन्वय आहे. तसेच माळवाडी शेलारवाडी कोटेश्वर वाडी येथील नागरिकांनी सांगितले की सैन्याबरोबर काम करण्यास मिळाले हे आमचे भाग्य आहे. यापुढे सैन्याच्या कोणत्याही सामाजिक उपक्रमात आम्ही जरूर सहभागी होऊ.
About The Author

