
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
शहरांमधील व मावळ परिसरातील अनेक भागात वडाच्या झाडाची मनोभावे पूजा वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला भगिनी करत आहे. वडाच्या झाडाला सूत गुंडी बांधून वडाला प्रदक्षिणा घालत आहे. पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनी वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालतात. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी उपवास देखील धरतात. वटपौर्णिमा सणाचे पती-पत्नीच्या नात्यासंबंधी अनेक महत्त्व आहे.
पती-पत्नीचे नाते दृढ व्हावे ही या सणाची मूळ संकल्पना आहे. वडाचे झाड हे दीर्घायुर्षी असल्याने व ते भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणारे असते म्हणून त्याची पूजा करण्याची प्रथा हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीच्या भाग राहिली आहे. तळेगाव व परिसरात अनेक ठिकाणी महिला भगिनी पारंपारिक वेशभूषेत तयार होऊन सामूहिक पणे वडाची पूजा करताना दिसत आहे. तसेच अनेक महिलांनी उपवास धरून घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून पूजन केले. तर अनेक महिलांनी घरीच वडाचे झाड लावून पतीच्या दीर्घा आयुष्यासाठी प्रार्थना केली.
About The Author
