
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगावकर नागरिक बंधू भगिनींसाठी मोफत शासनमान्य योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष अर्चना सचिन दाभाडे यांनी दिली.
हा उपक्रम तळेगाव दाभाडे दाभाडे आळी ‘श्रीराम’ मंदिरामध्ये दिनांक ११ ते १४ जून पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड, रेशन केवायसी, योजना, इ.श्रम कार्ड,नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती व ट्रान्सफर आदी सुविधा प्राप्त होणार आहेत.
ज्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी स्वतःचे आधार कार्ड, आधार नंबर मोबाईलला लिंक असणे आवश्यक आहे. स्वतःचा मोबाईल नंबर व लाभार्थी व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी या संधीचा जास्तीत नागरिकांनी लाभ घ्यावा.
About The Author
