
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शनिवार (दि. १४) रोजी “पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल PHC” चा उद्घाटन समारंभ आणि “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा” अत्यंत उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच दादा भुसे (शालेय शिक्षण मंत्री) निलमताई गोऱ्हे (विधानपरिषद उपसभापती) आण्णा बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष) यांच्यासह आमदार बापूसाहेब पठारे, शंकरभाऊ मांडेकर, माऊली (आबा) कटके, बाबाजी काळे विभागीय आयुक्त चंद्रकांतजी पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आमदार सुनील अण्णा शेळके आणि अन्य मान्यवर अधिकारी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
पुणे मॉडेल स्कूलची प्रमुख वैशिष्ट्ये:
– जागतिक दर्जाच्या भौतिक सुविधा
– २१व्या शतकातील कौशल्यांचा विकास
– मुलींसाठी विशेष शिक्षण व प्रोत्साहन कार्यक्रम
– समावेशी शिक्षणाची व्यवस्था
– ४ डिजिटल स्मार्ट क्लास रूम्स प्रागत प्रयोगशाळा
– समृद्ध ग्रंथालय
– व्यावसायिक शिक्षणाची ओळख
– क्रीडा शिक्षणावर भर
स्मार्ट मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र (Smart Model PHC):-
– पायाभूत सुविधा (Infrastructure)
– HIMS – हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम
– हरित प्राथमिक आरोग्य केंद्र (Green PHC)
– सौर ऊर्जा प्रणाली (Solar Electrification)
– वैद्यकीय उपकरणे (Medical Equipment)
यावेळी मावळ तालुक्यातील शाळा व शिक्षकांचा देखील गौरव करण्यात आला त्यामध्ये पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळखुटे शाळेस मिळाला तसेच पुणे जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्काराने रंजना सखाराम वाघ, जि. प. शाळा धामणे सुजाता बबन ताराळकर, जि. प. शाळा उर्से, वैशाली अशोक मिसाळ, जि. प. शाळा पुसाणे यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना उत्कृष्ट भविष्यासाठी एक मजबूत पायाभूत सुविधा ठरणार आहे.
तसेच याप्रसंगी ह्युंदाई इंडिया प्रा. लि. कंपनीच्यावतीने मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यांचे लोकार्पण देखील मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
About The Author

