
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
समाजामध्ये हा गोल्डन क्लब क्रांती घडवून आणेल आणि नवनवीन उच्चांक गाठेल. क्लबमध्ये आपल्याला जादू घडवून आणायची असेल तर महिलांनाचा जास्तीत जास्त समावेश करावा. तसेच नवयुवकांना देखील रोटरी क्लबमध्ये जास्तीत जास्त आणून त्यांच्यामधील शक्तींचा आपण वापर करून घेतला पाहिजे. रोटक्ट्रने 100 आरसीसी फॉर्म केले आहेत, रोटरीयनच्या संख्येत 26 टक्के वाढ झाली आहे, 46 गोल्डन क्लब स्थापन केले आहेत, छत्रछायालयामध्ये 111 क्लब स्थापन केले आहेत आणि रोटरी फाउंडेशला निधी आणण्याच्या कामात साऊथ देशामध्ये आपला क्लब अग्रक्रमात आहे, असे गौरवोद्गार रो. शितल शहा यांनी केले्रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेच्या चार्टर प्रधान व प्रथम पदग्रहण समारंभ अतिशय जल्लोषात पार पडला.
या वेळी डिस्टिक गव्हर्नर शितल भाई शहा, डी आय जी वैभव निंबाळकर, प्रोजेक्ट चेअरमन दीपक फल्ले, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे नवीन अध्यक्ष रो. संतोष परदेशी, सचिवपदी प्रदीप टेकवडे, उपाध्यक्षपदी प्रशांत ताये, सुहास ढमाले, शशांक फडके,प्रसाद साळवी, प्रदीप मुंगसे, निखील महापात्रा, दिनेश चिखले, महेश कुंभार, राकेश गरूड, गौरव शिरसाट, अमेय डे, विजय कदम, विजय गोपाळे, डॉ. धनश्री काळे, सुजाता देव, दीपाली शिंदे, दीक्षा वायकर, शेखर चौरे, किरण ओसवाल, हर्षल जव्हेरी, रितेश फाकटकर,प्रसाद देशमुख, डॉ. अजित भसे, बसप्पा भंडारी यांचा समावेश आहे.
या सर्वांनी मिळून रोटरीच्या डयुटीची शपथ घेतली. दिनेश चिखले यांच्या हस्ते क्लबच्या अहवालाचे प्रकाशन, क्लबच्या नियमावलीचे प्रकाशन निखील महापात्रा यांच्या हस्ते झाले. 51 हजाराचा चेक रो. शितल शहा यांच्या हस्ते रो. दीपक फल्ले यांना देण्यात आला.
पहिला गोल्डन पुरस्कार डॉ. मिलींद भोई यांना रो. शितल शहा यांच्या हस्ते देण्यात आला. मिलींद भोई यांनी सांगितले की, माणुसकी जागवणारा हा रोटरीचा उपक्रम आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये लिडरशीप ही महत्त्वाची असते.जात, पात, धर्म या गोष्टींमुळे माणूस माणसापासून दूर गेलेला आहे. माणसांना जवळ आणण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. युवकांनी समस्येच्या मुळाशी जाऊन क्रांती घडविण्याचे काम करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया केसकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले.
About The Author

