
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये (दि. १६) जून २०२५ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेणू शर्मा, पर्यवेक्षिका विजयमाला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प, मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सुंदर रांगोळ्या, फुलांची तोरणे , फुगे व पताका अशी आकर्षक सजावट करण्यात आली. अनोखे स्वागत पाहून विद्यार्थी भारावून गेले. विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतानाच नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेऊन यश संपादन करतील अशी आशा शालेय मुख्याध्यपिका रेणू शर्मा यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका रेणू शर्मा,पर्यवेक्षिका विजयमाला गायकवाड,सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शालेय शिक्षक सचिन झेंडे यांनी केले.
या स्तुत्य उपक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे,उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे ,सचिव मिलिंद शेलार सर,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी कौतुक केले. ज्ञान संपादन करून शाळेचे,कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश देऊन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
About The Author

