Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

दत्ताभाऊ खोंडगे यांच्या घरापासुन ते शिवभक्त अजितभाऊ शिंदे यांच्या घराकडे जाणार्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण झाले पाहिजे.कारण पावसाळ्यात येथील स्थानिक नागरिकांना आपल्या घराकडे जाताना पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने खुप त्रास होत होता व पावसाळ्यात नागरिकांचे रस्त्याअभावी खुप हाल होत होते .त्यामुळे आपण लवकर ह्या रस्त्याचे काम पुर्ण करावा,अशी मागणी शिवभक्त अजित शिंदे यांनी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती.

पावसाळ्यापुर्वी ह्या रस्त्याचे काम पुर्ण होईल, असे गावचे सरपंच दिलीपनाना शिंदे व ग्रा.पदाधिकार्यांचा आश्वासन दिले होते. यासाठी ओवळे ग्रामपंचायतीने ह्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे,म्हणुन पाऊस चालु असताना देखील पावसात ह्या रस्त्याचे काम चालु ठेवुन रस्ता पुर्ण केला .त्याबद्दल शिवभक्त अजित शिंदे यांनी व ग्रामस्थांनी ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व ग्रा.पदाधिकार्यांचे आभार मानले. तसेच ह्या रस्त्यासाठी ज्या शेतकर्यांनी आपली जागा दिली.त्या शेतकर्यांचे देखील आभार मानले.मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *