
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
योग करा व निरोगी रहा, शरीरासाठी नियमित योग करावे, असे प्रतिपादन योग प्रशिक्षक आदित्य कसाबी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, रनिंग ग्रुप व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिनानिमित्त तेली समाज मंगल कार्यालयात योगाशिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या व्यासपीठावर ‘गोल्डन रोटरी ‘चे अध्यक्ष संतोष परदेशी, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे, सहप्रांतपाल दीपक फल्ले, डॉ सौरभ मेहता, मंगेश मारवाडी, अमोल हिंगे, विशाल खळदे, अविनाश कुरणे हे उपस्थित होते. योग शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. योग शिबिरानंतर अल्पोपहाराची व्यवस्था व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख गौरव क्षीरसागर, ‘स्माईल चे संस्थापक’ हर्षल पंडित, दिनेश चिखले, राकेश गरुड, रीतेश फाकटकर, भरत खेडेकर, बाळू चव्हाण, साक्षी चिकुर्डे, संपदा कुरणे, रोहित रागमाले यांनी केले.
About The Author

