
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक गणेश किसनराव भेगडे, अध्यक्ष सुनील बबनराव भेगडे, सचिव दत्तात्रय पंढरीनाथ नाटक, अरुण जगन्नाथ भेगडे(पाटील), संतोष किसनराव भेगडे, विजय पांडुरंग गरुड, राहुल गोळे, रामराव जगदाळे हे मान्यवर या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते. सरस्वती पूजनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम क्रमांक सानिका आवटे.९६.२० टक्के, द्वितीय क्रमांक स्वरूप ओव्हाळ ९० टक्के, तृतीय क्रमांक साहिल गुजर ९० टक्के या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांच्या यशात मोठा वाटा असणाऱ्या माध्यमिक विभागात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा व मुख्याध्यापिका यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभ प्रसंगी अनेक विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author

