Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

लोणावळा शहरातील किंग्स वे या शाळेने तीन मुलांच्या शाळेचा दाखला ५३.,००० रुपये फी बाकी असल्याने देत नाही, अशा स्वरूपाची तक्रार मनसे लोणावळा शहराध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांना मिळतात त्यांनी आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांसह शाळेला दणका दिला. लोणावळा मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की,मनसे लोणावळा शहर यांच्या वतीने दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले होते की,  लोणावळ्यातील कोणतीही शाळा विद्यार्थ्यांची फी साठी अडवणूक करत असेल तर त्या शाळेला मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ही पोस्ट वाचून लोणावळा शहरालगत असलेल्या कुसगाव बुद्रुक येथील जगन्नाथ कांबळे यांनी लोणावळा मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली की, किंग्स वे या शाळेने माझ्या तीन मुलांना शाळेचा दाखला ५३,००० रुपये फी बाकी असल्याने दिला नाही. ही माहिती मिळताच निखिल भोसले यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर सदरची शाळा ही परवानगी नसल्याकारणाने बंद केली गेली आहे. त्यामुळे दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्यांचे अॅडमिशन करण्यासाठी शाळेने फि न भरल्या कारणाने सदरील तिन्ही मुलांचे दाखला व गुणपत्रिका शाळेने अडवून ठेवले आहे. मुलांचे पालक जगन्नाथ कांबळे यांची सध्याची परिस्थिती बिकट असल्याकारणाने ते खरंच शाळेची फी करू शकत नाही, असे मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांना आढळून आल्याने त्यांनी जगन्नाथ कांबळे व त्यांच्या मुलांना सोबत घेऊन किंग्स वे शाळेवरती धडक दिली व तीनही विद्यार्थी वैभवी कांबळे (इ. दहावी), साक्षी कांबळे (इ. सहावी), आदित्य कांबळे (इ. चौथी) या विद्यार्थ्यांचे दाखले पालक जगन्नाथ कांबळे यांना मिळवून दिले.
यावेळी लोणावळा मनसे शहराध्यक्ष निखिल हनुमंत भोसले, मनसे प्रवक्ते अमित भोसले, मनसे पदाधिकारी संदीप बोभाटे, सुनील सोनवणे, सुभाष रेड्डी, जुबेर मुल्ला, आकाश सावंत, कैवल्य जोशी, नरेश महामुनी आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *