Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

केरिंग अ‍ॅन्ड संस्थेमध्ये प्लास्टिकमुक्ती जनजागृती उपक्रमांतर्गत गोल्डन रोटरी क्लबच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन रोटेरियन दिक्षा वायकर यांनी केले.

स्पर्धेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम तीन क्रमांक घोषित करण्यात आले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोल्डन रोटरी क्लबच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर प्रास्ताविक रो. दिपाली शिंदे यांनी केले. रो. दीपक फल्ले यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्तीचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले. आभार प्रदर्शन रो. प्रशांत ताये यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *