Spread the love

तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी

प्राचीन बनेश्वर शिव मंदिरामध्ये गुरुवार (दि. १०) जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता श्री बनेश्वर महादेवाचा अभिषेक होणार आहे. पादुका अभिषेक व पूजन सकाळी ९ वाजता, धुनी आरती सकाळी ११:३० वाजता, महाप्रसाद दुपारी १२ वाजलेपासून, महाआरती रात्री ८ वाजता, एकतारी भजन रात्री ८:३० ते १०:३० वाजेपर्यंत तसेच दिगंबर हरी कुलकर्णी यांचे भक्ती संगीत गायन हा कार्यक्रम देखील होणार आहे. तरी भाविक भक्तांनी आपल्या गुरुप्रती आदरभाव व ऋण व्यक्त करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती श्री बनेश्वर सेवा मंडळ व माजी नगरसेवक संतोष भेगडे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *