
मोठया अपघाताची शक्यता

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
जिजामाता चौक ते घोरवाडी रेल्वे स्टेशन या रोड वरुन मालवाहू डंपर वेगाने जात असल्याने नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकते, त्यामुळे या डंपर वाहतुकीस प्रतिबंध करावा, असे निवेदन कुणाल आगळे शहर अध्यक्ष रा.काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पीआय (वरिष्ठ) कन्नय्या थोरात साहेब यांच्याकडे दिले. यावेळी सुहास गरुड पुणे जिल्हाध्यक्ष ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग), सामाजिक कार्यकर्ते सारंग आगळे, बळीराम गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोणावळा ते पुणे येथे रेल्वे लाइन ची तिसरी मार्गिका तयार करण्याचे काम चालू आहे व त्यासाठी घोरवाडी रेल्वे स्टेशन लगत तळेगाव दाभाडे येथे मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. मुरूम टाकण्यासाठी मोठेमोठे डंपर १५० ते २०० वेगाने जिजामाता चौक येथून घोरवाडी स्टेशन येथे जा-ये करत असतात. वेगाने जात असताना चिखल रोडवरती पडतो. त्यामुळे एखादा अपघात येथे घडू शकतो. याबाबतीत त्यांना बऱ्याच जनानी समज दिलेली आहे.
सदर रोड हा अत्यंत रहदारीचा आहे व अरुंद आहे. हे मोठे डंपर वेगाने गर्दीच्या ठिकानातून जात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. या डंपरला जाण्यासाठी हिंदमाता ब्रिज येथून पर्यायी रस्ता आहे. त्यांनी तेथून गेले तरी चालू शकते. तरीदेखील जाण्या-येण्याचा वेळ वाचावा यासाठी ते या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. तरीदेखील डंपरना वाहतुकीस प्रतिबंध करावा व रेल्वेच्या ठेकेदारस समज द्यावी. नाहीतर नागरिकांकडून हे डंपर बंद करण्यात येतील.
About The Author

