
समाज विद्रूप करणारी टोळी विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी लावतात; अभिमन्यू शिंदे यांनी केली कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास या मावळ भूमीला लाभला आहे. तसेच संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज या संत परंपरेचा तालुक्यात वारसा जपणारे वारकरी आहेत; परंतु अशा माझ्या मावळ भूमीला सध्या अमली पदार्थ सरास विक्री होत असल्याने तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. मावळ तालुक्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव, देहू, देहूरोड, कामशेत अशा मोठ्या शहरात सरासपणे गांजा, एमडी पावडर, ड्रग्ज अशा अमली पदार्थाची विक्री होत आहे. यामुळे काही शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी होत असल्याची माहिती अभिमन्यू शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
मावळ तालुक्यात विविध नामाकिंत विद्यापीठ, कॉलेज स्थापन झालेले आहेत. काही समाज विद्रूप करणारी टोळी विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी लावत आहे. तालुक्यात शालेय आवारात काही ठिकाणी सरासपणे गुटखा, तंबाखू, मावा विक्री केली जात आहे; ह्या अशा गोष्टीना आळा घालून माझ्या तरुण बांधवाना नशेच्या आहारी जाण्यापासून वाचवले पाहिजे, प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अभिमन्यू शिंदे यांनी केली आहे.
तालुक्यात अमली पदार्थाची सरासपणे विक्री होत असल्याच्या विरोधात दि. 15 ऑगस्ट 25 रोजी, सकाळी 10.30 वा. महादेव मंदीर, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन जवळ, कामशेत येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
About The Author
