
मतदानाचे महत्त्व सांगत मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात राबवली
उमरगा : प्रतिनिधी
शरणप्पा मलंग विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवडणूक अतिशय उत्साहात संपन्न झाली. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा, हर घर संविधान घर घर संविधान ,तिरंगा यात्रा, तिरंगा रांगोळी स्पर्धा विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, अशा अनेक बाबीवर विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याचेच औचित्य साधून मलंग विद्यालयात मतदानाचे महत्त्व सांगत मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात राबवली व त्यामधून मुख्यमंत्री व विविध खात्याचे मंत्री यांना त्यांची कामे व जबाबदारी सोपवून देण्यात आली. जेणेकरून शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मतदानाचे महत्त्व कळावे यासाठी या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले.
या प्रक्रियेत निवडणुकीत केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक अजित गोबारे मतदान अधिकारी म्हणून अगतराव मुळे, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, श्रीमती प्रभावती बिराजदार श्रीमती मीनाक्षी हत्ते, परमेश्वर कोळी व विजय सगर यांनी कार्य केले.
विद्यालयात विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीतून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना होऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या मंडळांने कार्य करावयाचे असते म्हणून पहिल्यांदा प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी निवडणुकीच्या माध्यमातून वर्ग प्रतिनिधी म्हणून त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी निवडला नंतर सर्व वर्ग प्रतिनिधींनि स्वतः या मंत्रिमंडळातील विशिष्ट पदासाठी निवडणूक लढवत असल्याची घोषणा केली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांना मत देण्याचे आवाहन केले. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या व योग्य प्रतिनिधीला आपले अमूल्य मत देऊन योगदान दिले. निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी चालते याचे योग्य कृतीयुक्त शिक्षण विद्यालयात देण्यात आले. या निवडणुकीत मराठी सेमी माध्यम व स्पेशल बॅच अशा जवळपास 450 विद्यार्थ्यांनी मतदान केले. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी परमेश्वर सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्या देशात लोकशाही शासन व्यवस्था ही निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वात येते कोणता ही कलह न होता राजकीय परिवर्तन घडते तेच आपणाला या विद्यार्थी संसदेच्या निवडणूक प्रक्रियेतून समजून घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मतमोजणी करून विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीतून खालील मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
मुख्यमंत्री गणेश रघुवीर भोसले, उपमुख्यमंत्री सिद्धार्थ महादेव इसाळे, शालेय क्रीडामंत्री माऊली माधव शिंदे, सांस्कृतिक मंत्री अमृता बालाजी लोहार, शालेय शिस्त पालन समिती आयुष उमेश आबाचणे, शालेय पर्यावरण मंत्री प्रेम राजकुमार जाधव, शालेय स्वच्छता मंत्री पूजा धनराज घोडके, शालेय आरोग्य मंत्री अनन्या विलास सरपे, शाळा सुरक्षा मंत्री आशिष बाळू जाधव असे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी हिप्परगे, सचिन हुडेकर, श्रीमती सुचित्रा आर्या, श्रीमती सोनी ढवळे, श्रीमती सुषमा गायकवाड, श्रीमती विद्या खमितकर, कलशेट्टी पाटील, दुष्यंत कांबळे, सुभाष जाधव, मोहन साखरे यांनी परिश्रम घेतले.
About The Author
