Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नूतन नगरपरिषद इमारत व शिवशंभु स्मारक या दोन्ही ठिकाणी शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार सुनील शेळके यांनी कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे काम हे अंतिम टप्प्यात पोहचले आहे व शिव शंभू स्मारकाचे काम देखील वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. दोन्ही वस्तूंचा लोकार्पण सोहळा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एकत्रित पणे करण्याचा मानस असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात आमदार सुनील शेळके. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक. शिवशंभू स्मारक समितीचे संस्थापक संतोष वसंत भेगडे (पाटील). तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे(पाटील). माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे. सुरेश चौधरी.माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे.रामभाऊ गवारे. संजय बाविस्कर. मंगेश सरोदे.बाळा घंगाळे. करुणा सरोदे व नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.शिवशंभू स्मारकाचे पुढील महिन्यात लोकार्पण होण्याची शक्यता असल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे असे नगरसेवक हे या नूतन नगरपरिषद इमारतीमधून शहराचा कारभार पाहणार असल्याने अनेक इच्छुक नगरसेवकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *