
देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला परिसर – स्वच्छ भारत, सुंदर भारताचा संकल्प
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
१५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त नवी सांगवी परिसर देशभक्तीच्या जल्लोषाने दुमदुमून गेला. हातात तिरंगा घेऊन शेकडो युवक, महिला व नागरिक या रॅलीत सहभागी झाले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. देशप्रेमाचा उत्साह आणि एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. या रॅलीचे आयोजन शिवसेना मावळ लोकसभा, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा बाईक रॅली फेमस चौक, साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, सेल पेट्रोल पंप, ब्लू डार्ट, गणेश मंगल कार्यालय रोड, एम.के चौक, क्रांती चौकपर्यंत काढण्यात आली.
रॅलीच्या प्रारंभी उपस्थितांनी “स्वच्छ भारत – सुंदर भारत” घडविण्याची शपथ घेतली. या शपथविधीमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी दृढ झाली.
नवी सांगवीतील साई चौक येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्यातून स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिकमुक्त भारताची गरज आणि पर्यावरण संवर्धन यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेघराज लोखंडे म्हणाले, “तिरंगा हा आपल्या स्वाभिमानाचा प्रतीक आहे. नवी सांगवीवासीयांचा जोश आणि देशप्रेम पाहून अभिमान वाटतो. ही बाईक रॅली ही केवळ देशभक्तीची झलक नसून शहीदांना आदरांजली आहे. त्याचबरोबर स्वच्छ भारत–सुंदर भारत घडविण्याचा निर्धार आणि पथनाट्याद्वारे दिलेला संदेश हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.”
या भव्य तिरंगा बाईक रॅलीमुळे नवी सांगवी परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला आणि स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जनमानसात पोहोचला.
यावेळी अमन शेख, गौरव जगताप, तन्मय सुतार, धम्मदीप गायकवाड, साहिल शेख, जॉय चोपडे, रेहाण जॉन, वेदांत नांदगावकर, शुभम पाटे, रमेश काळे, सौरभ जाधव, गोविंद गायकवाड, हर्षल पाटील, पवन गायकवाड, चैतन्य शिंदे, वरून सॅबिस्टीन, ऋषिकेश आलतेकर, असीम शेख, दुर्गादास बरडे, सागर माने, हर्षद शिंदे, आर्यन मसुरे, शंतनू नांगरे, संग्रामसिंग लोधा, चैतन्य जाधव, अक्षय चावरे, चैतन्य चावरे, अभिषेक केसकर, निरंजन भीवरकर, आयन रंगराज, हर्षद कीर्तिकर, सुशांत जाधव, अभिषेक थम्बे, प्रथमेश शिंदे,रोहित कांबले, अमन हिवाळे, रोहन आहुजा, यश कदम, आरुष कांबळे, प्रितेश देवकुडे, यश चिकले व असंख्य युवक तसेच आरोग्य विभागाचे महिला कर्मचारी देखील उपस्थित होते.
About The Author
