Spread the love

टिजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचा अनोखा उपक्रम

पुणे : प्रतिनिधी

टिजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरने तळेगावमधील सात गणेश मंडळांमध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये उज्वल मित्र मंडळ, पिंपरी गाव, नदीचा राजा गणेश मंडळ, चिखली, निसर्ग परिवार गणेशोत्सव मंडळ, तळेगाव दाभाडे, बाल विजय गणेश मंडळ, मोरदेवाडी मंचर, अश्वंत नगर सोसायटी गणपती मंडळ, तळेगाव दाभाडे, अवज्योत तरुण मित्र मंडळ, मामुर्डी आणि जय हनुमान मित्र मंडळ, रातोवाडी यांचा समावेश आहे. #BeatCancerWith Bappa’sBlessings या हॅशटॅगसह तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, थर्मल ब्रेस्ट स्क्रीनिंग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली, ज्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करण्यात आले. या प्रत्येक तपासणीसाठी केवळ १५-२० मिनिटांचा कालावधी लागला असून यामध्ये कर्करोग जागरूकता आणि त्यासंबंधी फॉलो-अपसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कर्करोगाच्या वाढत्या घटनांमुळे मृत्युदर आणि विकृतीचे प्रमाण वाढत असल्याने, वेळीच निदान हा रोग व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. टिजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरने स्थानिक मंडळांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजापर्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी प्रतिबंधात्मक तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात २७८ व्यक्तींनी (६० पुरुष आणि २१८ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला) सहभाग नोंदविला. २० ते ८० वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, २०-८० वयोगटातील महिलांसाठी थर्मल ब्रेस्ट स्क्रीनिंग आणि २५-६० वयोगटातील महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करण्यात आली. एकूण सहभागींपैकी ९ महिला आणि ३ पुरुषांसह १२ व्यक्तींना सवलतीच्या दरात मोफत सल्ला आणि चाचण्यांचा लाभ घेता येणार आहे.

या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. बाप्पाच्या दाराशी महत्त्वपूर्ण आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन करणे हे आमचे मूळ उद्दिष्ट्य होते. या गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि कर्करोगाविरुद्ध समुदायाला शिक्षित करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी यापुढेही असेच उपक्रम आयोजित करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *