Spread the love

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) पिंपरी चिंचवड शहरात आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड सिटी न्यूजचे मुख्य संपादक तसेच शहर पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख युनूस खतीब यांना “मोहसीन-ए-फख्रे-इन्सानियत” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

शहरात काढलेल्या मिरवणुका आणि स्वागत समारंभाच्या उत्सवी वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार युनूस खतीब आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवत आहेत. वंचित व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्धीन एम. शेख यांनी सांगितले.

“पत्रकार खतीब यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची खरी पोहोच आणि समाजमान्यतेची पावती आहे,” असे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी यावेळी सांगितले.

सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना पत्रकार युनूस खतीब म्हणाले, “सन्मानाने जबाबदारी अधिक वाढते. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांचा आहे.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *