Spread the love

२७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष ठरली

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत भव्य रक्तदान ‘अमृत महोत्सव’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत २७५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून मोदींना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळी ८ वाजता झालेल्या उद्घाटन समारंभाला शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषाताई ढोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक व समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक जयदीप खापरे यांनी केले, सहसंयोजक नामदेव पवार यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर विनोद मालू यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह भारतीय जैन संघटनेचे प्रकाश गादिया, विरेश छाजेड तसेच तेरापंथी युवक परिषदेचे पंकज गादिया यांनीही मोलाचे योगदान दिले.

‘अमृत महोत्सव’ रक्तदान शिबिरामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले असून, मोदींच्या कार्यशैलीप्रमाणेच सेवाभावाचा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *