तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रिडा मंडळ पुणे जिल्हा क्रिडा समिती आणि नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच नूतन अभियांत्रिकी मध्ये पार पडली. उदघाटनप्रसंगी पुणे जिल्हा क्रिडा समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे तसेच जिल्हा क्रिडा समितीचे सचिव डॉ. उमेशराज पनेरु, नूतन अभियांत्रिकी चे सीईओ डॉ. रामचंद्र जहागिरदार, प्राचार्य डॉ.एस.एन.सपली ,प्रबंधक विजय शिर्के, क्रीडाशिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा वेगवेगळ्या सात वजनी गटामध्ये घेण्यात आली. एकूण १२५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. नूतन महाविद्यालयामधील अश्वल्य तावडे या विद्यार्थ्याने ९३ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर मुलींच्या ५२ किलो वजनी गटात पुनुगोंडा इशीथा हिने देखील द्वितीय क्रमांक मिळविला. या दोन्ही विद्यार्थ्यांची अंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच नूतन अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ.एस.एन.सपली यांनी अभिनंदन केले.