तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि मायमर मेडिकल कॉलेज भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मोतीबिंदू आणि त्यावर उपचार तसेच कान नाक, घसा, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 80 जणांनी लाभ घेतला.
यावेळी आशा वर्कर्सचा शुभारंभ करण्यात आला. शहर आणि ग्रामीण भागात आशा वर्क मोठया प्रमाणात कार्यरत आहे. एक कर्तव्य दक्ष जागरूक नागरिक म्हूणन सुरेश शिंदे हयांचा गौरव केला.
या कार्यक्रमत रोटरी चे अध्यक्ष किरण ओसवाल उपाध्यक्ष भगवान शिंदे जिल्हा गव्हर्नर सुबोध मालपाणी सह गव्हर्नर अजित वाळुंज प्रकल्प प्रमुख दीपक फल्ले सह प्रकल्प प्रमुख विनोद राठोड संतोष परदेशीं पत्रकार रेखा भेगडे डॉ. महेश दर्पण गिरी निलेश राक्षे दिलीप पारेख सचिन कोलमकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण ओसवाल हयांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत ताये हयांनी केले. भगवान शिंदे हयांनी आभार मानले.