


अभिनेते श्री सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती अभिनेते
तळेगाव, दाभाडे : प्रतिनिधी
स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाले, तर अन्य कर्करोगाच्या तुलनेत त्यावर मात करण्याची शक्यता तिपटीपेक्षा अधिक असते. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग असून याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृतीची आवश्यकता तसेच निदानाचे महत्त्व लक्षात घेता तळेगाव, दाभाडे येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे मोफत मॅमोग्राफी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करत या उपक्रमाचे कौतुक केले.
वंचित महिला आणि ग्रामीण भागातील महिलांना या याचा नक्कीच फायदा होईल या निस्वार्थ उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रसिध्द अभिनेते श्री. सयाजी शिंदे, श्री. उदय देशमुख (ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष) आणि श्री. सचिन देशमुख (ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक), गणेश खांडगे (ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष) उपस्थित होते.
यावेळी अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली, ज्यामध्ये एआय-तंत्रज्ञाना र आधारित रेडिएशन थेरपी मशीन, आयसीयू, वॉर्ड आणि पीईटी-सीटी स्कॅनिंग युनिट यांचा समावेश आहे. केंद्रातील तज्ज्ञांनी अचूक उपचार आणि चांगल्या परिणामांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जात याविषयी त्यांना माहिती दिली. आरोग्य आणि पर्यावरण या दोघांचा परस्पर संबंध लक्षात घेत श्री. सयाजी शिंदे हे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपण मोहिमेतही सहभागी झाले.
या कार्यक्रमात बोलताना, टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन देशमुख सांगतात की, आमच्या मोफत मॅमोग्राफी सेवेचा शुभारंभ हा कर्करोगाचे वेळीच निदान हे थेट गरजूपर्यंत पोहोचविण्याकरिता एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. कर्करोगाच्या वाढत्या घटनांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, वेळीच निदान एखाद्याचा अमूल्य जीव वाचवू शकते.
सयाजी शिंदे सांगतात की, कर्करोगाशी लढण्यासाठी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर सक्रियपणे काम करत आहे हे पाहून मला खुप आनंद होतो. वेळीच निदान ही जगण्याची गुरुकिल्ली आहे आणि गरजूंना मोफत मॅमोग्राफी सुविधा पुरवत याठिकाणी त्यांना जीवनाची अमुल्य भेट देण्यात आली . आरोग्य आणि पर्यावरण अशा दोघांचा समतोल साधणाऱ्या टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे.
टीजीएच ऑन्को लाईफ कर्करोगाच्या उपचारांमध्ये नवनवीन शोध, सर्व समुदायपर्यंत पोहोचण्याकरिता विविध उपक्रम आणि प्रगत तंत्रज्ञानावर भर देते, ज्यामुळे या केंद्राने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.