
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कलपिनीची गुरुपौर्णिमा म्हणजेच कै. पुष्पलता अरोरा स्मृतिपुष्प गुरुवंदना कुमारभवनच्या कुमारांनी केलेल्या सुंदर नाटुकल्यांनी सुंदर साजरी झाली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या डाॅ. लता पुणे,आयुर्वेदाचार्य, त्यांच्या भगिनी छाया,कलापिनीचे विश्वस्त डाॅ.अनंत परांजपे, कार्याध्यक्षा सौ. अंजली सहस्त्रबुध्दे, उपाध्यक्ष अशोक बकरे, व कार्यकारिणी सदस्या डाॅ. विनया केसकर या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली.मुलींनी गोड आवाजात श्लोक म्हणून वातावरण प्रसन्न केले. कुमारभवनच्या मुलांनी ‘गुरुने दिला ज्ञानरूपी वसा’ ही गुरुवंदना सादर केली. या गीताला समीर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. गीताला तबल्याची साथ श्रीहरी टिळेकर व पेटीची साथ शुभंकर घाणेकर यांनी केली. त्या नंतर ऋचा पोंक्षे यांनी कुमारभवन मधे चालणाऱ्या उपक्रमांची माहीती दिली.नंतर कुमारभवनच्या मुलांनी स्वतः लिहून दिग्दर्शित केलेली व अभिनय केलेली गुरुंची महती सांगणारी छोटी नाटुकली सादर केली. दर गुरुवारी ‘चला नाटक शिकूया ‘ या उपक्रमांतर्गत शिकवलेल्या “चिऊताई चिऊताई दार उघड” या कवितेचे नाट्यीकरण आर्या पंडित आणि जान्हवी पावसकर यांनी सुंदर सादर केले. त्याची थोडक्यात माहीती संदिप मनवरे यांनी दिली. डाॅ. लता पुणे यांनी बालभवनच्या अनेक उपक्रमांची उजळणी केली आणि मुलांना आरोग्याच महत्त्व सांगितल. विद्यार्थ्यांच्या वतीने चिन्मयी लिमये व शिवानी पाटोळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. डाॅ. विनया केसकर यांनी सर्वांचे आभार मानले.

कुमारभवनच्या मुलांनी उर्वरित नाट्यछटांचे सादरीकरण केले.सर्व नाट्यछटांच सूत्रसंचलन शर्वरी पायघण ने केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सुमेर नंदेश्वर यांनी सांभाळली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मधुवंती रानडे यांनी केले. बालभवन प्रशिक्षिका मीरा कोण्णूर, मनिषा शिंदे,विशाखा देशमुख व माधवी एरंडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम छान पार पडला.
About The Author

