
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, वाहणगाव व शासकीय आदिवासी आश्रम शाळा, वडेश्वर येथे (दि. १४) रोजी शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या विशेष प्रयत्नातून व अनंत ओब्राईन (इनरव्हील क्लब, तळेगाव पदाधिकारी) यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविला.
यावेळी वाहणगाव येथील आठवी ते दहावीतील १४० विद्यार्थी व वडेश्वर आश्रम शाळा येथील दहावी-बारावीच्या ९४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अमिता ओब्राईन –एडिटर(इनरव्हील क्लब), रश्मी थोरात-अध्यक्ष (इनरव्हील क्लब), स्वाती दाभाडे (सदस्य),देसाई मॅडम, राजूभाऊ खांडभोर (शिवसेना तालुका प्रमुख),काळुराम वाडेकर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष),संतोष गाभले, शाळा समिती अध्यक्ष, शासकीय आदिवासी आश्रम शाळा आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. भैरवनाथ विद्यालयच्या विनय कसबे (मुख्याध्यापक) यांनी शाळेच्या वतीने स्वागत केले व आभार मानले, तर शासकीय आदिवासी शाळेच्या वतीने गोगावले सर अधीक्षक यांनी आभार व स्वागत केले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
About The Author

