Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक -१६ मधील खंडोबा मंदिर ते MIDC रोड पर्यंतच्या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्याचे डांबरीकरण हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे जवळपास निम्म्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: झालेली दुरावस्था त्वरित रस्ता दुरुस्त करण्यासाठी सायली म्हाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. १४) रोजी सकाळी ११:०० वाजता खंडोबा मंदीर ते MIDC रोड या रस्त्याच्या संदर्भात विधिवत श्राध्य आंदोलन करण्यात आले.

या ठिकाणाहून दररोज जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुढे चालावे लागते.त्यामुळे या रस्त्यावर नियमित अपघात होत आहेत. या रस्त्याने विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांची कायम वर्दळ असते. त्यांना चालताना खूप त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मागील तीन वर्षांपासून दरवर्षी सदर रस्त्याची संबंधित ठेकेदाराकडून चार ते पाच वेळा तात्पुरत्या स्वरुपाची डागडूजी करण्यात आली परंतु ती सुद्धा पूर्णत: अपुरी आणि निकृष्ट दर्जाची झाली आहे, यामुळे रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा आहे कि खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. या आंदोलनात वडगाव शहर तसेच प्रभाग क्रमांक १६-मधील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव म्हाळस्कर मा. सभापती पं.स. मावळ, संभाजी म्हाळस्कर अध्यक्ष भाजपा वडगाव, रविंद्र म्हाळस्कर मा. नगरसेवक नगरपंचायत वडगाव, अनंता कुडे विश्वस्त सचिव पोटोबा देवस्थान, किरण म्हाळस्कर मा. नगरसेवक नगरपंचायत वडगाव, अतुल राऊत पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल रा.कॉं. श.प.गट, विशाल वहिले मावळ युवक अध्यक्ष रा.कॉं.श.प.गट, सुनिल शिंदे उद्योजक, प्रभाकर वाघमारे जेष्ठ समाजसेवक, तानाजी तोडकर प्रसिद्धीप्रमुख मावळ मनसे, मच्चीन्द्र मोहिते अध्यक्ष वडगाव शहर मनसे, संतोष म्हाळस्कर उपाध्यक्ष वडगाव शहर मनसे, सुरज भेगडे अध्यक्ष तळेगाव शहर मनसे, राणीताई म्हाळस्कर मा. युवती अध्यक्ष महिला आघाडी भाजपा, राधा कारंडे प्रभाग १६ नागरीक, महेंद्र शिंदे अध्यक्ष नानोली गाव मनसे, शुभम म्हाळस्कर अध्यक्ष मावळ गर्जना गणेशोत्सव मंडळ, गणेश पंडीत ढोरे उद्योजक, प्रविण ढोरे शिवसेना शहर अध्यक्ष वडगाव, गणेश भांगरे उद्योजक आदी उपस्थित होते.

या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आले आहेत त्या पुढीलप्रमाणे –

१) वडगाव पैसाफंड साखळी रस्ता त्वरीत डागडुजी करून पावसाळ्यानंतर तो पूर्ण डांबरीकरण करणे.

२) साखळी रस्ता ते साईसृष्टी सोसायटी मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डागडुजी करणे.

३) खंडोबा मंदिर ते MIDC रोड पर्यंत पथदिवे लावणे.

४) वायकर चाळ येथील अरुंद रस्ता त्वरित रुंद करण्यात यावा.

५) नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणी गतिरोधक बसविणे.

६) निवेदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करून नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबद्दल योग्य तो गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत त्वरीत समाविष्ट

करणे.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *