
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करून यशाची परंपरा चालू ठेवली आहे.इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी ४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,त्यापैकी ३७ विद्यार्थी पात्र ठरले असून शेकडा ८६ टक्के निकाल लागला आहे. त्यातील तब्बल आठ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे.त्याचप्रमाणे मावळ तालुक्यात शहरी विभागात प्रथम क्रमांकाचे स्थान कु. सौम्या अमोल अलबते हिने ९०.६०% गुण मिळवून प्राप्त केले आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत तिने विसावा क्रमांक प्राप्त केला आहे.कु.रोशनी बापूराव गुंजाळ मावळ तालुक्यात सातवी जिल्ह्यात १९० वी, चि.अमेय विजय करळे तालुक्यात नववा जिल्ह्यात २१५ वा, कु.संस्कृती मनोहर सोमवंशी तालुक्यात अकरावी जिल्ह्यात २५८ वी, चि.संकेत निलप्पा गडदे तालुक्यात १४ वा जिल्ह्यात ३९१ वा , कु.तन्वी दत्तोबा शेंबडे तालुक्यात १७ वी जिल्ह्यात ४१९ वी , कु.नम्रता विठ्ठल मोकाशी तालुक्यात २१ वी जिल्ह्यात ४७१ वी, चि.कार्तिक विनोद देसले तालुक्यात २० वा जिल्ह्यात ४७७ वा आला असून या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने यश संपादन केले आहे.इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कु.शौर्या दामोदर गदादे हिने तालुक्यात नववा व जिल्ह्यात २३३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. अशा प्रकारे शाळेतील नऊ विद्यार्थ्यांनी यंदा जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ शाळेत संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे,सहसचिव प्रा.वसंत पवार,मुख्याध्यापक संतोष खामकर, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.पालकांचाही सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा, मेहनत,जिद्द,अभ्यासातील सातत्य, त्याचप्रमाणे शिक्षकांचे मार्गदर्शन, नियोजन यामुळे हे यश संपादन झाले असे सचिव यादवेंद्र खळदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले.सहसचिव प्रा.वसंत पवार यांनी विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश निश्चितच मोठे असून शाळेच्या नावलौकिकात वाढ करणारे आहे,असे मनोगतात सांगितले. सर्व विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करण्यात आले. इयत्ता पाचवीसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक स्वाती शिंदे, राजश्री कसबे, सुजाता डावखरे, प्रतीक्षा ढवळे त्याचप्रमाणे इयत्ता आठवीसाठी मार्गदर्शक शिक्षक श्रीमती कीर्ती मोहरीर, बालम शेख, संभाजी ठाकूर,सारिका थरकुडे या सर्व शिक्षकांचा,तसेच मुख्याध्यापक संतोष खामकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.तर पालकांमधून प्रतिभा अलबते,अपर्णा गदादे, शिक्षकांमधून स्वाती शिंदे,कल्पना गाडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
संतोष खामकर यांनी विद्यार्थी,पालक, शिक्षकांचे अभिनंदन करून संस्थाचालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा ढवळे यांनी केले.श्रीहरी तनपुरे,सुजाता डावखरे,राजश्री कसबे,सारिका थरकुडे,स्वाती शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापकांच्या सहकार्याने केले होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन मावळ तालुका व तळेगाव शहरात सर्वत्र होत आहे.
About The Author
