तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील स्टेशन भागात असणाऱ्या तलाव परिसरात येत्या रविवार, २० जुलै २०२५ रोजी सायं. ५ वाजल्यापासून एक विशेष निसर्गप्रेमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Earth Watch आणि Wildlife Rescuer of Maval या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेल्या या कार्यक्रमात ‘स्पायडर वॉक’ आणि मॉथ वीक सेलिब्रेशन अंतर्गत कोळ्यांच्या आणि पतंगांच्या अद्भुत आणि बहुरंगी जगाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
हा उपक्रम तळेगाव दाभाडे तलाव परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास, निरीक्षण आणि लोकांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे. कार्यक्रमात प्रख्यात कीटक व वन्यजीव तज्ज्ञ सहभागी होणार असून, ते कोळ्यांचे व पतंगांचे जीवनचक्र, त्यांचे वर्तन, आणि त्यांच्या पर्यावरणातील भूमिकेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे सहभागी व्यक्तींना हे सर्व शिकण्याची संधी मिळेल.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागींसाठी प्रमाणपत्र (Certificate of Participation) आणि चविष्ट अल्पोपहार (Snacks) देण्यात येणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम नि:शुल्क असून, सर्व वयोगटातील निसर्गप्रेमींनी यात सहभागी व्हावे असे आयोजकांचे आवाहन आहे. निसर्गाशी जवळीक साधण्याची आणि स्थानिक जैवविविधतेविषयी ज्ञान मिळवण्याची ही एक दुर्मीळ संधी आहे.
या अनोख्या निसर्ग सफरीत सहभागी होण्यासाठी आपली उपस्थिती आवर्जून नोंदवा आणि कोळ्यांच्या व पतंगांच्या रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण विश्वात एकत्र डोकावूया, असा संदेश Earth Watch व Wildlife Rescuer of Maval
निलेश संपतराव गराडे संस्थापक अध्यक्ष वन्यजीव रक्षक मावळ संस्था
यांनी आवाहन केले आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित राहावे हि विनंती अधिक माहितीसाठी ९८२२५५५००४ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
About The Author
