
आगामी स्थानिक निवडणुकांबाबत चर्चा!
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ लोकसभा चे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या थेरगाव जनसंपर्क कार्यालयात मावळ तालुका शिवसेना पक्षाची प्रमुख पदा धिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकी बाबत चर्चा करण्यात आली. निवडणूकी संदर्भात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विशाल हुळावले यांनी केले तर प्रस्तविक शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी केले
यावेळी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, मावळ तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे,उप तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, संघटक मदनभाऊ शेडगे संघटक अमितभाऊ कुंभार, उपतालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, संघटक चंद्रकांतजी बोत्रे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, महिला तालुका संघटिका सौ. शुभांगीताई काळंगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केसरी, शिवसेना वडगाव शहर प्रमुख प्रवीण ढोरे,युवा सेना मा. जिल्हा प्रमुख गिरीश सातकर शिवसेना देहूरोड शहर प्रमुख दिपक चौगुले, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, नवनाथ हारपुडे, लोणावळा उप शहर प्रमुख विशाल पठारे, युवा सेना उप प्रमुख नितीन देशमुख व मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
