
हाणेगाव प्रतिनिधी /फारुख पटेल :
हाणेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देगलुर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲड प्रितम देशमुख यांच्या नेतृत्वात जगात सर्वश्रेष्ट दान रक्तदान या संकल्पनेतुन महारक्तदान संकल्प आयोजीत करण्यात आला होता यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे प्रशांत देशमुख यांच्या हस्ते पुजन करुन शिबीराची सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील व परीसरातील नवतरुन व भाजपाचे कार्यर्त्यांनी आपलं रक्तदान केले यात प्रेम पाटील,धनाजी नाईकवाडे,प्रशांत रामपुरे,श्रयश देशमुख, आकाश देशमुख, युवराज स्वंतकर,अंगद पाटील,तुळशीराम वळगे,मनोज पाटील,इम्रान पठाण,प्रदिप स्वंतकर, महेश ध्याडे,शाम नुदनुरे असे जवळपास १०० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले .
यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रमेश सावकार राणे,मरखेल पोलीस ठाण्याचे प्रमुख रविंद्र हुंडेकर ,शिवकांत अप्पा माळगे,मधुकर पाटील,यनगुंदे गुरुजी,रमाकांत फुलारी ,नांदेड ब्लड बँक सेंटरचे कर्मचारी आदीजन उपस्थित होते.
About The Author
