
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
कॊशल विकास केन्द्र,तळेगाव येथे एसीजी केअर्स फौंडेशन, मुंबई व मिटकॉन कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने टू व्हिलर व इलेक्ट्रिकल वाहन टेक्निशियन (वेळ ४ ते ६), नर्सिंग असिस्टन्ट (स १० ते १) असे विविध कोर्स सुरु होत आहे. सर्व कोर्सला पात्रता किमान १० वी पास, वय मर्यादा १८ ते ४५ हि आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना आत्मविश्वास वाढवून त्याचा सामाजिक व शाश्वत विकास साधण्यासाठी कॊशल्यावर आधारित रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे, असे सेंटर व्यवस्थापक देविदास आडकर यांनी सांगितले आहे. तरी विद्यार्थी, तरुण, तरुणी, सुशिक्षित बेरोजगारांनि या मोफत कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन आडकर यांनी केले आहे.
कौशल्य विकास केन्द्र, अभुदय बँकेच्यावर,आदर्श कॉलेजजवळ, तळेगाव स्टेशन रोड येथे ऑफिस असून, वेळ सकाळी १० ते सायं ६ आहे.अधिक चॊकशीसाठी ८९९९४५४४२१, ८९८३३१३६९१ या नंबरवर सपंर्क साधावा.
About The Author
