
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
नितीनभाऊ मराठे मित्र परिवार यांच्या वतीने वराळे येथील नागरिक, बंधू-भगिनीसाठी मोफत शासनमान्य योजनांचा प्रारंभ शुक्रवार (दि.२५) ते रविवार (दि. २७) जुलै पर्यंत जिल्हा परिषद शाळा, वराळे आणि शिक्षक सोसायटी वराळे, इंद्रायणी कार्यालयासमोर येथे करण्यात येणार आहे.
‘माझ गाव, माझी माणस, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून वराळे येथील नागरिकांसाठी मोफत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती नितीनभाऊ मराठे यांनी दिली. यामध्ये नवीन मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, स्मार्ट आधार कार्ड, किसान कार्ड, मोफत सरकारी कार्ड,रेशन कार्ड केवायसी आदी सुविधा प्राप्त होणार आहे. यासाठी आधार कार्ड, ७/१२ गट नंबर, रेशन कार्ड, लाईट बिल, बॅक पासबुक, फोटो, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. ज्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे ,त्यांचा स्वत:चा आधार कार्ड नंबर मोबाईलला लिंक असणे आवश्यक आहे.
तरीही या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक नितीनभाऊ मराठे, प्रशांत मराठे, जितेंद्र मराठे, निलेश मराठे, अनिल मराठे, सुनील मराठे, संदीप मराठे आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
About The Author
