Spread the love

तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील श्री क्षेत्र घोरावडेश्वर शिवमंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून सोमवार (दि. २८ जुलै ) २०२५ रोजी श्री घोरावडेश्वर महादेवाला पवनामाई च्या पवित्र जलाने १०१ कलश कावड भरून आणून अभिषेक होणार आहे.

गहुंजे पवना नदी-मामुर्डि- शितळानगर – देहूरोड- सेंट्रल चौक ते घोरावडेश्वर डोंगर हा कावड यात्रेचा मार्ग राहणार आहे. कावड यात्रेची वेळ सकाळी ९:३० वाजता गहुंजे, पवना नदी येथून सुरू होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी या कावड यात्रेचा लाभ घ्यावा. अशी विनंती श्री घोरावडेश्वर गोरक्षनाथ सेवा ट्रस्ट व आदेश सेवा मंडळ यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी ९३०९९१८५९६/७७४५८७००३६ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *