Spread the love

तळेगाव दाभाडे :प्रतिनिधी

वडगाव नगर पंचायतीच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील अनेक त्रुटींविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सोमवार (दि. २८) जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर, वडगाव मावळ येथे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सुधाकरराव आव्हाड उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा हा जाणीवपूर्वक व पूर्णत: मनमानीपणे तयार केला असल्याचे निदर्शनास आले असून आराखडयाचे प्रारूप हे बिल्डरांसाठी तारक व शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचे दिसून येते. या अन्यायाविरूध्द कायदेशीर लढा देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. तरी सर्व हरकतदारांनी आपल्या सूचना व हरकतींचे संबंधित कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन वडगाव शहर कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *