
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
आपल्या गीतांनी अजरामर झालेले व सिने संगीतात बादशहा मानले गेलेले महान गायक स्व: मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवार (दि.३१) जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता एक बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. रफी साहेबांनी गायलेल्या अजरामर गीतांची गोडी यावेळी श्रोत्यांना ऐकण्यास मिळणार आहे. तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीतील लायन्स क्लब सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, रसिकांना त्याचा विनामूल्य आनंद घेता येईल. रफी साहेबांची गाजलेली गाणी यावेळी स्थानिक कलावंत सादर करणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य आनंद लुटावा, असे आवाहन मोहम्मद रफी फॅन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक सूर्यकांत हरिभाऊ काळोखे व अध्यक्ष नितीन खळदे यांनी केले आहे.
About The Author
