
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
येथील पुनम उबाळे यांची माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुनम उबाळे यांचे सामाजिक कार्य, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील योगदान तसेच महिला भगिनींसाठी केलेले कार्य यामुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ अमर चौरे यांनी दिली.
येत्या ५ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळावा घेण्यात येणार आहे त्यासाठी मी योगदान देईन माय रमाई फाउंडेशन ट्रस्टची मी ऋणी आहे. फाउंडेशनने माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. यासाठी मी सर्व प्रकारे मनापासून प्रयत्न करेन असे आपल्या मनोगतात पूनम उबाळे यांनी सांगितले. तळेगाव शहराध्यक्षपदी निवड झाल्याने पुनम उबाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
About The Author
