
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली आहे.
राज्यात जिल्हा परिषद. पंचायत समित्या. नगरपंचायती. नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून लवकरच त्यांच्या तारखा जाहीर होणार आहेत.या निवडणुका राज्यातील सत्ताधारी महायुती म्हणून लढण्यात येणार असून मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( अजित पवार गट) शिवसेना( एकनाथ शिंदे गट) एकत्रितपणे लढतील.
मावळ तालुक्यातील सर्व घटक पक्षांच्या वरिष्ठांनी एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घ्यावा असे बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले. जेथे एकमत होणार नाही तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील असेही त्यांनी सांगितले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे माजी नगरसेवक संतोष दाभाडे( पाटील) यांचे नाव जाहीर केले आहे. या विषयाच्या अनुषंगाने बाळा भेगडे म्हणाले की शेळके यांनी आपल्या पक्षातील इच्छुकांची नावे जाहीर करावीत. दुसऱ्या पक्षातील उमेदवाराबाबत मौन बाळगावे. हे युतीसाठी हितवाह नाही त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारांची नावे दिली असती तर आम्हाला आक्षेप नसता. त्यांच्या पक्षाकडे कदाचित सक्षम उमेदवार नसेल म्हणूनच त्यांनी भाजपाच्या उमेदवारीची घोषणा केली असावी असा सूचक टोला बाळा भेगडे यांनी लागवला.
पत्रकार परिषदेच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे. मंडल अध्यक्ष चिराग खांडगे. माजी नगरसेवक रघुवीर शेलार. माजी नगरसेवक सचिन टकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
