
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
गोल्डन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व चिखले एक्वा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावनेतून युथ डायरेक्टर रो दिनेश चिखले यांची कन्या ध्रीती हिच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक ३ या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले. यावेळी बोलताना गोल्डन रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष रो संतोष शांताराम परदेशी म्हणाले की सामाजिक बांधिलकी सर्वांनी जपावी व आपल्या मुला मुलींच्या वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करावा. चिखले परिवाराने आपल्या मुलीचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांबरोबर साजरा केल्याने परदेशी यांनी चिखले परिवाराचे कौतुक करत ध्रीती चिखलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग. गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत रामचंद्र ताये, सचिव प्रदीप टेकवडे, सदस्य विजय गोपाळे, सुरेश बावबंदे, प्रदीप मुंगसे, राकेश गरुड, चेतन पटवा, बसप्पा भंडारी, ललित देसले व चिखले परिवाराचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
