
वन्यजीव रक्षक मावळ, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव यांचा उपक्रम
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
वन्यजीव रक्षक मावळ, पुणे वनविभाग,पुणे आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव पर्यावरण जनजागृती चित्रकला स्पर्धा रविवार (दि . १०) ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सुशील मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. बालवाडी ते इयत्ता दुसरी-चित्र रंगवा, इयत्ता तिसरी ते सातवी-माझा आवडता वन्यजीव, इयत्ता तिसरी ते १२ वि – माझे पर्यावरण माझी जबाबदारी, खुला गट- मानव आणि वन्यजीवांतील सघंर्ष हे विषय देण्यात आले आहे. सर्व ग्रुपला प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धकांसाठी व उपस्थितांसाठी आकर्षक ५ लकी ड्रॉ बक्षिसे काढण्यात येणार आहे. बक्षिस वितरण समारंभ दुपारी २ ते ४ पर्यंत असेल. तसेच मोफत रक्तदान शिबीर व नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.
About The Author
