Spread the love

१८० इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती यशस्वीरित्या संपन्न..!

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष,पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा समितीच्या अंतर्गत नव्याने नियुक्त होणाऱ्या विविध विभागीय समित्यांमध्ये पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती नुकत्याच मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. यावेळी एकूण १८० इच्छुक कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली. अजूनही ही प्रक्रिया प्रगतिपथावर असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल.

जिल्हा कार्यकारिणीसाठी १ अध्यक्ष,८ उपाध्यक्ष,४ सरचिटणीस(१ SC/ST,१ महिला ),८ चिटणीस,१ कोषाध्यक्ष,जिल्हा पदाधिकारी (७ महिला,२ SC/ST) तसेच ६९ जिल्हा कार्यकारिणी सदस्य (२३ महिला व ४ SC/ST) अशी रचना असते तसेच विविध मोर्चा,प्रकोष्ठ सेल अध्यक्ष यांची नियुक्ती देखील या प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांच्यासोबत विविध विभाग प्रमुख, शहर कार्यकारिणी सदस्य, व वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते.

मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुकाने संघटनात्मक अनुभव, सामाजिक योगदान आणि भविष्यातील कार्ययोजना यावर आपली मते मांडली. यावेळी एकूण १८० पेक्षा अधिक इच्छुक कार्यकर्त्यांनी आपली नावे नोंदवून मुलाखतीसाठी उपस्थिती लावली. मुलाखतीदरम्यान इच्छुक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या संघटनात्मक अनुभव, सामाजिक कार्यातील सहभाग, पक्षविषयक ज्ञान,भविष्यकालीन कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “भारतीय जनता पक्षात पद ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी कर्तृत्ववान, निष्ठावान, संघटनेच्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली जाईल. पक्षाची परंपरा गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आहे. त्यामुळे कोणत्याही शिफारसीपेक्षा इच्छुकांच्या कर्तृत्व, जबाबदारीची जाणीव आणि संघटनेप्रती निष्ठा या आधारेच त्यांची नियुक्ती केली जाणार आहे, असे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.

लवकरच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिक नव्हे,तर कार्यक्षम नेतृत्व तयार करण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मुलाखतीदरम्यान अनेक नव्या चेहऱ्यांनी सकारात्मक व व्यावहारिक दृष्टिकोन मांडला, ज्यामुळे शहरात भाजपचा पुढील नेतृत्वाचा मजबूत पाया घातला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *