
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
भेगडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २०२५ सालच्या अध्यक्षपदी समीर शंकरराव भेगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबरोबरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले हे मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आले आहे. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे हे मंडळाचे आधारस्तंभ असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल सुरू आहे.
२०२५ सालची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष -समीर शंकरराव भेगडे, उपाध्यक्ष -गणेश भेगडे, अभय भेगडे, महेश काकडे, अजिंक्य सातकर, मितुल भेगडे, सुमित लांजेकर, खजिनदार – शुभम चंद्रकांत लांडे,सहखजिनदार- देवेश भेगडे, प्रतीक भेगडे, अक्षय पाटोळे, स्वराज भेगडे, राहुल गरुड,अजय पवार, सरचिटणीस – शिवम गणेश भेगडे, चिटणीस – दर्शन भेगडे, दीपेश जाधव, ओम भेगडे, सार्थक भेगडे, विराज भेगडे, साहिल भेगडे, प्रसिद्धी प्रमुख : प्रथमेश तानाजी भेगडे.
About The Author
