
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
लोणावळा शहरातील हॉटेल ओव्हन फ्रेश येथील कामगार काही दिवसापूर्वी मनसेला भेटून आमचे पगार हॉटेल प्रशासन देत नाहीत अशी तक्रार मनसे लोणावळा अध्यक्ष निखिल भोसले यांच्याकडे केली होती.संबंधित कामगार हे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन आले परंतु त्यांना कोणीही न्याय दिलेला नाही. अशी परिस्थिती असताना मनसे अध्यक्ष श्री. निखिल भोसले तसेच लोणावळा मनसे प्रवक्ते श्री.अमित भोसले आणि मनसे उपाध्यक्ष श्री. दिनेश कालेकर यांनी आज दिनांक-03/08/2025 रोजी हॉटेल बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित हॉटेल प्रशासनाने काल रात्रीतून सर्व कामगारांचा ऑनलाईन पद्धतीने पगार केलेला आहे. सर्व कामगारांना न्याय मिळाल्यानंतर कामगारांनी लोणावळा मनसेचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी उपस्थित लोणावळा मनसे अध्यक्ष श्री. निखिल भोसले, प्रवक्ते श्री.अमित भोसले, उपाध्यक्ष श्री. दिनेश कालेकर, श्री.सुनील सोनवणे, जुबेर मुल्ला, सुभाष रेड्डी, कैवल्य जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसे कडे दाद मागितल्यानंतर मनसे ही न्याय देणारच…. लोणावळा शहरात मनसेचे सध्या जोरदार काम चालू असल्याने लोणावळा शहरातील जनतेच्या घराघरात मनसे ही पोहोचलेली आहे. आणि याच भावनेतून जनतेच्या बोलण्यातून मनसेचा नगरसेवक लोणावळा नगर परिषदेमध्ये निवडून यावा अशी भावना जनतेमधून सध्या आपल्याला पहावयास मिळाले.
About The Author
