
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार आणि येणाऱ्या काळात लोकांना वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही, असे मत अनिल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी,वंचित बहुजन युवा आघाडी,भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल, माथाडी कामगार, जनरल युनियन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजित वडगाव येथील हॉटेल अजय येथे करण्यात आले होते.
यावेळी बैठकीला प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या उपस्थित
सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल अभिनंदनपर लाडूवाटप कार्यक्रम करण्यात आले.
संदिप कदम युवा अध्यक्ष यांनी रस्त्यावर उतरून जन सुरक्षा विधेयक कायद्या विरोधात तीव्र निषेध मोर्चा, आंदोलनची तयारी करणार असल्याचे सांगितले.
नितीन ओव्हाळ अध्यक्ष यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबतीत ध्येयधोरणे व आखणीबाबत मार्गदर्शन केले. मनिषा ताई ओव्हाळ महिला आघाडी अध्यक्षा यांनी येणाऱ्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण तयारीणीशी उतरणार असल्याचे सांगितले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी कारण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका
तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ लोखंडे, पुणे जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष जयश्री सदावर्ते, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, ससाणे, हर्षदा गजरमल, लहू लोखंडे, सुनील वाघमारे, प्रवीण रोकडे, दिनेश गवई आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून काही युवा आणि महिलांचे पक्ष प्रवेश करण्यात आले. देहूरोड, सोमाटणे,तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा या सर्व ठिकाणचे अध्यक्ष तसेच तालुक्यातील महिला भगिनी आणि त्यांची कार्यकारिणी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा प्रवक्ते जिजाभाऊ सोनावणे तर सूत्रसंचालन प्रवीण भवार यांनी केले. आभार युवा महासचिव अक्षय साळवे यांनी मानले.
About The Author
