
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
वडगांव मावळ बाह्यवळण पुणे मुंबई महामार्ग जुना ४ नवीन क. ४८ हा रस्ता पूर्वी गावाबाहेरून होता तो आता गावाच्या मध्यावर आला आहे. वडगांव हे तालुक्याची राजधानी आहे. शासकिय कामासाठी मावळ तालुक्यतील आदिवासी गोरगरीब जनता, नागरीक यांना वडगाव या ठिकाणी यावे लागते. तसेच न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील सुमारे ३ हजार विदयार्थी यांना हा रस्ता दररोज ओलांडावा लागतो. सदर रस्ता ओलांडताना अनेक अपघात झालेले आहेत. त्यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावर उधाणपुल किंवा भुयारी करावा, अशी मागणी वडगाव कातवी शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
तसेच दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे सदर रस्ता ओलांडणे नागरिकांना मोठे जिकरीचे झाले असुन, अक्षय हॉटेल ते माळीनगर वडगांव या क्षेत्रामध्ये दरवर्षी अपघात होत आहे. या गोष्टीची दखल घेवुन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार १ सप्टेंबर २०१६ रोजी सदर महामार्गावरील अपघात स्थळाना केंद्रीय परिवहन झोन विभागाचे अधिकारी यांनी भेट देवुन पाहणी देखील केलेली आहे. या प्रसंगी तत्कालीन परिवहन उत्तर विभागाचे अधिकार जैरवाल, रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता विश्वनाथ आवटे, संजय गांगुर्डे तसेच आयआरबीचे अधिकारी, तसेच स्तुप कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी यांनी संयुक्तीकरित्या सदर स्थळांची पाहणी केलेली आहे.
About The Author
